जळगाव जिल्हा

गर्भलिंग तपासणी केली जात असल्याच्या तक्रारीनंतर आर्या हॉस्पिटलचे सोनोग्राफी मशीन सील..

जळगाव-

बळीराम पेठेतील आर्या हॉस्पिटलमध्ये नियमांचे उल्लंघन करून गर्भलिंग तपासणी केली जात असल्याच्या तक्रारीनंतर जिल्हा प्रशासनाने सोमवारी अचानक कारवाई केली. जिल्हा शल्यचिकित्सक आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने केलेल्या तपासणीत अनेक अनियमितता प्रथमदर्शनी आढळून आल्याने रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन जागेवरच सील करण्यात आले.
आर्या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग तपासणीला परवानगी नसतानाही असा प्रकार सुरू असल्याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने तत्काळ आरोग्य विभागाचे पथक गठीत करून चौकशीचे आदेश दिले.तपासणीदरम्यान रुग्णालयाला २० आठवड्यांपर्यंत गर्भपात करण्याची कायदेशीर परवानगी असताना २१ आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीच्या गर्भवतींचे गर्भपात करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. तसेच रुग्णालयातील नोंदवह्यांमध्ये आवश्यक त्या नियमित नोंदी नसल्याचे आणि काही नोंदी संशयास्पदरीत्या उपलब्ध नसल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.याशिवाय गर्भपात प्रतिबंधक कायदा आणि गर्भलिंग तपासणीविरोधी कायद्याबाबतची आवश्यक माहिती दर्शविणारे फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आलेले नव्हते. सोनोग्राफी मशीनसाठी आवश्यक असलेले एमआयसी प्रमाणपत्रही तपासणीवेळी आढळून आले नाही. या कारवाईत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे, मनपाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ, जिल्हा रुग्णालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य आणि डॉक्टरांच्या आठ सदस्यीय पथकाचा सहभाग होता.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!