जळगाव जिल्हा

पाचोरा येथील “एच डी एफ सी” बँकेसमोर रस्ताच बनला पार्किंगचा अड्डा!

पाचोरा-

पाचोरा : शहरातील एचडीएफसी बँकेसमोर रस्त्यावरच बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बँकेत येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने थेट रस्त्यावरच वाहने उभी केली जात असून, याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.

बँकेसमोर रस्त्यावरील वाहन

बँकेसमोर वाहनांची गर्दी वाढल्याने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहनचालकांना मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते. रस्त्यावरून पायी जाणाऱ्या नागरिकांनाही वाहनांच्या गर्दीमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बँकेच्या ग्राहकांसाठी पार्किंगची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ग्राहकांनी रस्त्यावर वाहने उभी करावीत आणि त्याचा त्रास इतरांनी सहन करावा, ही परिस्थिती किती दिवस चालणार, असा संतप्त सवालही नागरिक करत आहेत.


एचडीएफसी बँक प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन ग्राहकांसाठी योग्य पार्किंगची व्यवस्था करावी, तसेच रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, संबंधित प्रशासन आणि वाहतूक यंत्रणेनेही या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यावर बेशिस्तपणे वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रस्ता हा वाहतुकीसाठी आहे की पार्किंगसाठी? असा प्रश्न आता पाचोऱ्यातील नागरिक उपस्थित करत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!