“मावा नाटे,मावा राज “जल, जंगल,जमीन, हमारा है!यासाठी कार्य करणार;गडचिरोली जिल्ह्यात कोरची ते सिरोंचा पर्यंत विराट ग्रामसभा यात्रा काढणार

गडचिरोली-मेंढा (प्रतिनिधि राजमोगली दुर्गम)
गडचिरोली जिल्ह्यातील चौदाशे ग्रामसभा सक्षमीकरणासाठी ग्रामसभा लेखामेंढा चे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा यांनी पुढाकार घेतलेला आहे. व याबाबत महत्त्वाची बैठक ग्रामसभा कार्यालय लेखा “मेंढा” येथे संपन्न झाली, व याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली या चर्चेत राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. प्रणय भाऊ खुणे सहभागी झाले होते व प्रामुख्याने ग्रामसभा पुसेर इलाका येथील ग्रामसभेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने या विषयाला मूर्त रूप देण्यासाठी सविस्तर चर्चा झाली, गडचिरोली जिल्ह्यामध्ये “मावा नाटे मावा राज ” पुन्हा आला पाहिजे व जल जंगल जमीन हमारा है, ना मंत्रालय,ना मिनी मंत्रालय, सबसे बडा गावका “ग्रामसभा मंत्रालय ‘हेच सर्वश्रेष्ठ व वरिष्ठ सभा आहे याकरिता कार्य करण्यात येणार आहे,प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यातील समस्त ग्रामसभेचे हक्क व अधिकार काय आहेत याबद्दल संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामसभा मधे त्यांचे हक्क व अधिकार याबद्दल जाणीव जागृती करण्यासाठी कार्य करण्यात येणार आहे.
त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील कोरची ते सिरोंचा पर्यंत विराट ग्रामसभा यात्रा काढण्यात येणार आहे. व जिल्ह्यातील समस्त तालुक्यातील ग्रामसभेकडून समस्यांची जाणीव करून घेण्यात येणार त्याची समस्याची प्रश्नावली तयार करून या कार्यक्रमाचा समारोप करण्यात येईल व ग्रामसभेचे समस्त प्रश्न सोडवण्यासाठी सदर प्रश्नावली केंद्र सरकार व राज्य सरकार राज्याचे राज्यपाल महोदय यांना देण्यात येणार आहे, सदर ग्रामसभेचे समस्या सोडवल्याशिवाय आता थांबणार नाही अशी भूमिका घेण्यात आली, याबद्दल चर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुणे, केसरी पाटील मट्टामी,इलाका कार्यकर्ता, मधुकर कोवासे,सुरज पोटावी, कोमटी नरोटे ग्रामसभा अध्यक्ष रामू हेडो,इलाका सचिव नामदेव मट्टामी, हरीश कुमरे ग्रामसभा सचिव सुधाकर तुमरेटी रमेश अधिकारी जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय मानवाधिकार संघटन,भीमराव वनकर भामरागड तालुका मानवाधिकार संघटना अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



