पेंटीपाका येथे दुसरी शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

सिरोंचा-(प्रतिनिधी-राजमोगली दुर्गम)
सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेंटीपाका येथे दुसरी शिक्षण परिषद उत्साहपूर्ण व शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली. शिक्षकांच्या ज्ञानाची देवाणघेवाण, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा वापर आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या दृष्टीने या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रघू दुर्गम होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक आर. आर. अग्गुवार यांनी केले. तसेच केंद्रप्रमुख अशपाक शेख यांचे मार्गदर्शन लाभले.शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक आर. आर. अग्गुवार, एस. आर. गोदारी व श्रीमती पुष्पा केवट यांनी विशेष परिश्रम घेतले.परिषदेतील विविध शैक्षणिक सत्रांसाठी राजपूत मॅडम, सावंत मॅडम, बिलगे सर, गोदारी सर, मेघा मॅडम, भजगवडे सर व कल्लुरी सर यांनी सुलभक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
या कार्यक्रमाला गट विकास अधिकारी माननीय कस्तुरे सर, विस्तार अधिकारी माननीय आईंचवार सर, तसेच गट साधन केंद्राचे कुंभारे सर व कोकुर्डे सर यांची विशेष उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांना विद्यार्थीकेंद्रित व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मार्गदर्शन केले.
शिक्षण परिषदेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शैक्षणिक प्रदर्शनालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनामध्ये विविध शैक्षणिक साहित्य, उपक्रम व नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी शकुंतला मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व अधिकारी, केंद्रप्रमुख, सुलभक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.




