राज्य

जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने एक दिवसीय बंद

सिरोंचा -(प्रतिनिधी-राजमोगली दुर्गम)

ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशन व अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या आवाहनानुसार सोमवार दि. ०७ सप्टेंबर २०२६ रोजी एकदिवसीय ई-पॉस मशीन बंद व धान्य वितरण बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

या आंदोलनात गडचिरोली जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार सहभागी होणार असून, सोमवारी जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने बंद राहतील, असे आवाहन स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन संघटना, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष श्री. लिलाधर भर्रे यांनी केले आहे.

बंदची कारणे

ऑनलाईन पद्धतीने धान्य वितरणासाठी वापरण्यात येणारी ई-पॉस (इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल डिव्हाइस) मशीन अत्यंत संथ गतीने काम करत आहे. वारंवार खालील तांत्रिक अडचणी येत आहेत:
१. सर्व्हर डाऊन असणे
२. इन-बिल्ट सिम नेटवर्क समस्या
३. आधार प्रमाणीकरण रद्द होणे
४. ओटीपी जनरेट न होणे व ओटीपी प्रमाणीकरण न होणे
५. केवायसी न होणे

त्यामुळे धान्य वितरणात मोठा अडथळा निर्माण होत असून दुकानदार आणि लाभार्थी दोघेही अडचणीत सापडले आहेत.

शासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, या मागणीसाठी हा एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारण्यात आला आहे.

तरी सोमवारी जिल्ह्यातील कोणत्याही रेशन दुकानावर धान्य वितरण आणि इतर कामे होणार नाहीत, याची सर्व रेशन लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!