जळगाव जिल्हा

अहिर सुवर्णकार मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

पाचोरा-

अहिर सुवर्णकार मंडळ, पाचोरा जिल्हा जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६ रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला.शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून मा. श्री. विनेशजी एकनाथशेठ कोठलीकर (धर्मदाय सह आयुक्त, पुणे विभाग, पुणे), मा. श्री. सिद्धेश संजय थोरात (वैज्ञानिक अधिकारी, टाटा मूलभूत संशोधन संस्था – TIFR, मुंबई) तसेच मा. सौ. निताताई प्रविणशेठ जडे (महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट कारागीर पुरस्कार प्राप्त, हस्तकला, पारोळा) यांची उपस्थिती लाभली.गुणगौरव सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करण्यात आले. शिक्षणाच्या बळावर जीवनात प्रगती साधताना मेहनत, सातत्य, शिस्त आणि जिद्द यांना महत्त्व आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी, त्यांच्या कलागुणांना व गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळावे आणि समाजातील इतर विद्यार्थ्यांनीही शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न करावेत, या हेतूने मंडळाने हा उपक्रम आयोजित केला.

विद्यार्थ्यांचा सन्मान हा केवळ त्यांच्या यशाचा गौरव नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दिलेली प्रेरणा आहे. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासोबतच समाजात शिक्षणाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते.
अहिर सुवर्णकार मंडळाच्या या उपक्रमाचे समाजबांधवांकडून कौतुक होत असून, गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!