जळगाव जिल्हा

पाचोरा येथे विपश्यना साधना शिबिर उत्साहात

पाचोरा-

येथील श्री सु. भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर येथे रविवार दिनांक 10 डिसेंबर रोजी विपश्यना साधनेचे प्रथम चरण आनापान सती या अनमोल विद्येचे शिबीर उत्साहात संपन्न झाले.

येथील उपशिक्षिका सारिका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी खास बालकांसाठी या शिबिराचे आयोजन केले जाते. या शिबिरात पुज्य विश्व विपश्यनाचार्य श्री सत्यनारायण गोयंकाजी यांच्या व्हिडिओ आणि ऑडिओ द्वारे या अनमोल विद्येची शिकवण बालकांना दिली जाते. शिबिराचे संचालन बाल आनापान शिबीर शिक्षक करतात. यात प्रामुख्याने मुलांना मनावर नियंत्रण, ताबा ठेवण्यासाठी शिकविले जाणारे शिक्षण/तंत्र असते.

शिबारार्थी मुलांनी नियमित सराव केल्यानंतर अनेक फायदे यातून जाणवतात. शिबीराला विपश्यना शिबीर केलेले साधक सेवा देतात. हे शिबीर निशुल्क असते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!