जळगाव जिल्हाराजकीय
पाचोरा येथे प्रताप हरी पाटील यांचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न.

पाचोरा-
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील यांचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज दिनांक 31ऑक्टोबर गुरुवार रोजी संपन्न झाले.
या कार्यालयात पाचोरा तालुक्यातील कार्यकर्ते थेट नानासाहेब प्रताप हरी पाटील यांची भेट घेवू शकतात. सदर पक्षाचे कार्यालय राजे संभाजी चौकाच्या बाजुला असलेल्या गाळ्यात आहे.कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे उमेदवार नानासाहेब प्रताप हरी पाटील, जेष्ठ नागरिक शिवाजी आत्माराम पाटील, डॉ. पूनमताई प्रशांत पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नानासाहेबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.