जळगाव जिल्हा

पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लखीचंद पाटील यांच्या सह 50 तरुणांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

भडगाव-

आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पुन्हा राजकीय उंच भरारी घेतली असून पाचोरा – भडगाव मतदारसंघातील विविध पक्षांना जोरदार दे धक्का त्यांकडून देण्यात आला आहे. मुंबई येथील वर्षा निवसस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते पाचोरा भडगांव मतदारसंघांचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे नेतृत्वात भडगाव येथील लकीचंद पाटील व पाचोरा येथील सुमारे 50 कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदेगटात दिनांक 3 जुलै बुधवार रोजी रात्री 11 वाजता जाहीर प्रवेश केला आहे.

आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या विकासात्मक दृष्टीकोणावर विश्वास ठेवून तसेच कार्यशैलीवर विश्वास ठेवून आमदार किशोर आप्पा पाटील नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते भडगाव येथील युवा नेतृत्व लखीचंद पाटील यांचे सह सुमारे 50 तरुणांचा जाहीर प्रवेश करण्यात आला असल्याने पाचोरा भडगाव राजकारणात इतर पक्षांना जोरदार धक्का मानला जात आहे. आमदार किशोर आप्पा पाटील पक्षहित दृष्टीने एका मागे एक खेडी खेळत पाचोरा भडगाव राजकारणात मुरब्बी राजकाणी असल्याचा अनुभव दाखवताना सर्वसामान्यांना दिसून येत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!