राज्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यादव कुटुंबास मदतीचा धनादेश सुपूर्द


ठाणे-

वर्सोवा खाडीशेजारी एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामावेळी घडलेल्या दुर्घटनेत जेसीबीसह अडकलेल्या राकेश यादव या मजुराच्या कुटूंबियांना आज मदतीचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्ते सुपूर्द करण्यात आला. राकेश यादव यांच्या कुटूंबियांना ठाणे येथील निवासस्थानी बोलावून त्यांना हा धनादेश देण्यात आला.

एमएमआरडीएला दिलेल्या निर्देशानुसार एल अँड टी कंपनीच्या वतीने ३५ लाख रुपये तर १५ लाख विम्याचे असे एकूण ५० लाखांचा धनादेश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राकेश यादव यांच्या कुटूंबियांना देण्यात आला. तसेच राकेशचा भाऊ दुर्गेश याला एल अँड टी कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली आहे.
राकेश यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीए, एल अँड टी, सैन्यदल, तटरक्षक दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ यांचे एकत्रितपणे प्रयत्न सुरू आहेत. मात्र तत्पूर्वी यादव कुटूंबियांना ही मदत सुपूर्द करण्यात आली आहे.

यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशीला यादव, वडील बालचंद्र यादव, मुलगी रिशु आणि परी यादव, मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसेच, एमएमआरडीएचे सह- आयुक्त राधबिनोद शर्मा, एमएमआरडीएचे मुख्य अभियंते चामलवार, एमएमआरडीएचे वरिष्ठ अभियंते हनुमंत सोनवणे, एल अँड टीचे प्रकल्पप्रमुख कॉलिन, माजी नगरसेवक एकनाथ भोईर उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!