क्राईमराज्य

‘हाई झुमका वाली पोर’ फेम अभिनेत्याविरोधात लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल.

नाशिक-

हाई झुमका वाली पोर फेम गाण्याचा अभिनेता अडचणीत आलाय. ‘झुमका वाली पोर’ या सुप्रसिद्ध गाण्याचा निर्माता आणि अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याची तक्रार महिलेने केलीय. पीडितेने ही तक्रार नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली.
लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक आणि आर्थिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केलाय. गेल्या ५ महिन्याच्या काळात विविध ठिकाणी नेत अत्याचार तसेच मारहाण केल्याचाही आरोप या पीडितेने केलाय. नाशिकरोड पोलिसांकडून या घटनेबाबत अधिक तपास केला जात आहे.
‘झुमका वाली पोरं’ हे अहिराणी गाणे सोशल मिडियावर तुफान ट्रेंडिंग गाणं आहे. या गाण्याच्या माध्यमातून अभिनेता लोकप्रिय झाला होता. आता या अभिनेत्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेचा अधिकचा तपास नाशिकरोड पोलीस करत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!