जळगाव जिल्हा

पाचोरा पिपल्सतर्फे सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा होणार सत्कार

पाचोरा-

नुकताच राज्यभर १० वी व १२वीच्या विद्यार्थ्यांचा  निकाल लागला असुन येथिल दि.पाचोरा पिपल्स बॅंकेनेही सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्याचे आयोजिले आहे.

जळगाव,पाचोरा,जामनेर,भडगावया तालुक्यांसह नगरदेवळा,शेंदुर्णी येथे विस्तार असलेल्या  बॅंकेच्या सभासदांना बॅंकेचे चेअरमन अॅड.अतुल संघवी,व्हा.चेअरमन प्रशांत अग्रवाल,सर्व संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एस.पाटिल यांनी अवाहन केले आहे की, ज्या सभासद पाल्यांनी १० वी आणी १२ वी मध्ये ७५ टक्के गुण किंवा त्यापेक्षा ज्यास्त गुण असतिल अशा सर्वांनी गुणपञिकेची झेराॅक्स,नाव,पत्ता व संपर्क नंबर जवळच्या शाखेत १४ जुन पर्यंत  द्यावे असे अवाहन केले आहे.सर्व शाखांची माहीती एकञित करून सालाबादाप्रमाणे समारंभपुर्वक या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारीतोषिक व प्रशंसापञ देउन सन्मानित करण्यात येणार आहे.तरी सभासदांनी दि पाचोरा पिपल्स बॅंकेच्या जवळच्या शाखेत संपर्क करावा.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!