जळगाव जिल्हा

पाचोरा!अंतुर्ली फाट्याजवळ अपघातात युवक जागीच ठार


पाचोरा-

पाचोरा शहरातील अंतुर्ली फाट्याजवळ आज दिनांक 19 मे रविवारी रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास भिषण अपघात घडला असून यात एक युवक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील मांदुरणे येथील रहिवासी हल्ली मुक्काम भडगाव येथील यशवंत माळी फायनान्स मध्ये काम करणाऱ्या या युवकाचा पाचोरा शहराजवळील अंतुर्ली फाट्याजवळ भीषण अपघात झाला, त्याचे दुचाकीस अज्ञात  चारचाकी  वाहनाची धडक  लागल्याने यशवंत माळी हा जागीच ठार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या भीषण अपघातात यशवंत माळी या युवकाचा मृत्यू झाला असून घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक निळू भाऊ यांचे मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आलेला असून घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस करीत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!