जळगाव जिल्हा

आज पाचोरा बंद न ठेवता महाविकास आघाडी;काळ्या फिती लावून करणार आंदोलन


Pachora | कै.तात्यासाहेबांचा फोटो मी बॅनर वरती लावणार नाही,आमदार किशोर आप्पा पाटील यांनी घेतला निर्णय

पाचोरा-

बदलापुर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद च्या हाकेत पाचोरा बंद ची हाक महा विकास आघाडीने दिली होती मात्र आज दि.२४ चा बंद मागे घेण्यात आला आहे.

महाविकास आघाडीने बदलापुर येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद पुकारला होता मात्र उच्च न्यायालयात एका याचिकेचा न्याय बघता न्यायालयाचा मान राखत महाविकास आघाडी ने महाराष्ट्र बंद मागे घेण्यात आला आहे. पाचोरा बंद ची हाक देण्यात आली होती तसे निवेदन पाचोरा पोलीसांना देण्यात आले होते मात्र महाविकास आघाडीचे वरीष्ठांचे निर्देशानुसार आजचा बंद मागे घेण्यात आला असल्याचे निवेदन पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना देण्यात आले यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष अझर खान, शिवसेना उबाठा शहर प्रमुख अनिल सांवत, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, हरुण पटेल, उबाठा युवा सेना शहर प्रमुख मनोज चौधरी, हरीश देवरे काँग्रेस ओबीसी सेल तालुका अध्यक्ष इरफान मनियार, आदी उपस्थित होते.
बदलापुर घटनेच्या निषेधार्थ आज दि २४ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते काळ्या फिती लावून सनदशीर मार्गाने आंदोलन करणार आहेत या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शिवसेना उबाठा च्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, तालुका अध्यक्ष शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, कॉग्रेस शहर अध्यक्ष अँड अमजद पठाण यांनी केले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!