क्राईमजळगाव जिल्हा

पाचोरा बसस्टॅण्ड येथे गर्दीचा फायदा घेत चोरी करणाऱ्या महीलेस पोलीसांनी केली अटक..

पाचोरा-

जळगांव जिल्ह्यामध्ये बस स्टॅण्ड  भागात चोरी करणाऱ्यांवर जिल्हा व पाचोरा शहरात चोरींचे गुन्हे उघड करुन आरोपीतांचे शोध घेवुन कारवाई करणेबाबत पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी राहुलकुमार पवार  पोलीस निरीक्षक पाचोरा यांना सुचना दिल्या होत्या.दिनांक 15/04/2026 रोजी फिर्यादी जयश्री स्वप्नील पाटील वय-22 वर्षे व्यवसाय- गृहीणी रा. विवेकानंद कॉलनी भडगाव जि. जळगांव फिर्यादी आसनखेडा येथुन पाचोरा येथे बसने एम.एम. कॉलेज येथे पेपर देण्यासाठी आली असता पेपर संपवुन दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास पाचोरा बस स्टॅण्ड येथुन आसनखेडा येथे जाण्यासाठी जळगांव बस मध्ये बसुन जात असतांना फिर्यादीचे गळ्यातील 3 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत कोणीतरी अज्ञात इसमाने चोरुन नेल्याबाबत पाचोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. यावरुन पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजी.नं.174/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहीता प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिनांक 15/04/2026 रोजी अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना गोपनिय माहीतीच्या आधारे महीला नामे- संगिता करण सोळुंखी वय- 42 वर्षे ही पाचोरा बस स्टॅण्ड परीसरात चोरी करुन फिरत आहे अशी माहीती प्राप्त होताच गुन्हे शोध पथकाने सदर महीलेस ताब्यात घेवुन गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता तिने गुन्ह्याची कबुली देवुन गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमाल एक सोन्याचा मनी व दोन डोरले असा मुद्देमाल काढुन दिला.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी,अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर,उपविभआगीय पोलीस अधिकारी पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक  राहुलकुमार पवार, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ सफौ.विलास पाटील, पोलीस हवालदार श्रीकांत गायकवाड, अंमलदार पोकॉ योगेश पाटील, पोकॉ गणेश कुवंर, महीला पोलीस अंमलदार प्रिया आहेर यांनी केली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार श्रीकांत गायकवाड, हे करत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!