क्राईमजळगाव जिल्हा

चार दिवसात नवरी फरार;लग्नासाठी अडीच लाखाचा गंडा,नऊ जणांवर गुन्हे दाखल..

जामनेर-

जामनेर तालुक्यातील पहूर येथे 30 मार्च वार सोमवार रोजी कु.पायल हरिदास तिजारे वय 27 राहणार नागपूर हिने आईला प्यारेलस झालेला आहे. तिच्या दवाखान्यासाठी औषध गोळ्यासाठी अडीच लाखांची मागणी केली होती मात्र ती 2,20,000 हजार रुपये ठरले व तिचा विवाह हिंदू चालीरीती प्रमाणे पहूर ता. जामनेर येथील रवींद्र प्रभाकर काळे यांच्याशी झाला. लग्नासाठी 2,20,000 रोख रक्कम व बसत्यासाठी इतर खर्च 30,000 हजार रुपये असे अडीच लाखांचा गंडा देऊन दिनांक 3 एप्रिल शुक्रवार रोजी मध्यरात्री अडीच ते साडेतीन वाजेच्या दरम्यान रवींद्र काळे सह घरातील सर्व 5 लोकांना शितपेयामध्येपेय गुंगीचे औषध देऊन घराला बाहेरून कडी लावून फरार झाली असून याबाबत लग्न जुळून देणारे एजंट तुषार श्रावण पाटील कोल्हे, राजू प्रकाश माळी कोल्हे, अजय लोहार गाडी चालक व मालक राहणार कोल्हे गाडी नंबर एम एच 20 एफ वाय 1279 मिनाबाई संजय टाकारे छ.संभाजीनगर, अनिता उर्फ पुष्पा ग्यानिराम दंशरे मु.पो.ता. भडगाव,सरला संतोष तोकडे नाशिक नवरीची मावशी, ज्ञानेश्वर उर्फ नाना राजपूत रा. कंकराळा ता. सोयगाव नवरीचा मामे भाऊ नाव माहित नाही,  9 जणांनी मिळून अडीच लाखांचा गंडा मारून फरार झाले आहे. पळून गेलेल्या पत्नीचे आधीच दुसऱ्या मुलाशी लग्न झाले असल्याचे संशय असून तिच्या पर्समध्ये जुनी नकली मनी मंगळसूत्राची पोत सापडल्यामुळे संशय येत आहे. या बाबत पहूर  पोलीस स्टेशनला  कलम 420 व इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे व पोलीस कॉन्स्टेबल राहुल पाटील व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहे. 

                    विवाह जोडताना दक्षता घेण्याची

गरजलग्नाच्या नावाखाली आर्थिक फसुनुक टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. केवळ मध्येस्थांवर अवलंबून न राहता मुलीच्या घरी जाऊन प्रत्यक्ष माहिती घ्या व मुलीच्या शेजारी पाजारी व गावात चौकशी करूनच कुटुंबाची खातरजामा करावी लग्न जुळून देण्यासाठी कोणी जर पैसे मागत असेल तर सावध व्हा

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!