चोरीचे दोन गुन्हे तीनच तासात उघड; पाचोरा पोलीसांची धडाकेबाज कारवाई

पाचोरा–
आक्सानगर जारगाव येथील गोडावून मधुन अज्ञात चोरट्याने गोदरेज कंपनीच्या तीन एसी चोरल्याची घटना घडली होती,तसेच सोन्याची पोत चोरी बाबत देखील पाचोरा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता, ह्या गुन्ह्याचा तपास पोलीसांनी तीनच तासाच उघड केल्या मुळे परीसरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.या घटनेबाबत सविस्तर वृत असे की, दिनांक 16/4/2026 रोजी नय्युम जहांगिर देशमुख व्यवसाय इलेक्ट्रीक दुकान रा. आक्सानगर जारगाव ता. पाचोरा यांच्या अक्सानगर जारगाव येथील गोडावुन मधुन 94500/-रुपये किंमतीचे तीन गोदरेज कंपनीचे ए.सी. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी दिनांक 01/4/2026 रोजी दुपारी 12:00ते दिनांक 14/4/2026 रोजी दुपारी 16.00 वाजेच्या दरम्यान चोरुन नेले होते. सदर बाबत पाचोरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरुन पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा रजि.नं. 177/2026 भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी बापु रोहोम यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पाचोरा पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकातील, सफौ विलास पाटील, पोहेकॉ.वसीम शेख, पोहेकॉ.श्रीकात गायकवाड, पोकॉ.योगेश पाटील, पोकॉ.संदीप राजपुत, पोकॉ.गणेश कुंवर नेमणूक पाचोरा पोलीस स्टेशन यांनी गुन्ह्यांचे गांर्भीय लक्षात घेवुन तातडीने तपास चक्रे फिरवुन गोपनीय माहीती काढुन आरोपी रिहान हमीश शहा वय 22 रा.हनुमानगर पाचोरा ता.पाचोरा जि. जळगाव हा निष्पन्न करुन त्यास लागलीच ताब्यात घेवुन बौध्दीकौशल्य वापरुन आरोपी रिहान हमीश शहा वय 22 रा. हनुमानगर पाचोरा ता.पाचोरा जि. जळगाव याने गुन्हा केल्याची कबुली दिल्यावरुन त्यांच्याकडुन गुन्ह्यांत चोरीस गेलेली मुद्देमाल 94500/-रुपये किंमतीचे तीन गोदरेज कंपनीचे ए.सी. हस्तगत केले आहे. त्याप्रमाणे पाचोरा पो.स्टे.गुन्हा रजि.नं. 174/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे दि. 15/4/2026 रोजी दाखल गुन्ह्यांत 30,000/-रु. सोन्यांची पोत चोरीचा गुन्हा असे दोन्ही गुन्हे पोलीसांनी दाखविलेली तत्परता व तीन तासात दोन्ही गुन्ह्यात गेलेला संपुर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याने संबंधीत फिर्यादी व परीसरातील जनतेने पोलीस दलाचे मुक्तकंठाने कौतुक करुन कर्तव्यदक्ष पोलीसांचे आभार मानले आहे. गुन्हे करणारे या गुन्हेगारांवर वेळीच पाचोरा पोलीसांनी वचक बसविला आहे.



