जळगाव जिल्हा

योगेश मधुकर ठाकूर यांची भाजयुमो जळगाव पश्चिम जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

पाचोरा-

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सक्रिय, अभ्यासू व तळागाळातील कार्यकर्ते योगेश मधुकर ठाकूर यांची भारतीय जनता युवा मोर्चा, जळगाव पश्चिम जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष संघटनेत सातत्याने केलेल्या प्रभावी कामाची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.

योगेश ठाकूर यांनी भाजयुमो मध्ये कार्यकारिणी सदस्य, शहर चिटणीस, शहर सरचिटणीस तसेच शहराध्यक्ष अशा विविध पदांवर यशस्वीपणे काम करत संघटन बळकट करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे. युवकांना भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीशी जोडणे, नव्या कार्यकर्त्यांची फळी उभी करणे तसेच विविध सामाजिक, जनहिताचे आणि संघटनात्मक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे.

पाचोरा-भडगाव विधानसभा प्रमुख अमोल भाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पाचोरा शहर व परिसरात पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने मेहनत घेतली. बूथस्तरापासून युवकांमध्ये पक्षाची ताकद वाढविणे, संघटन तळागाळापर्यंत पोहोचविणे आणि पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

योगेश ठाकूर यांच्या निवडीमुळे युवा मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असून, युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या नियुक्तीबद्दल पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!