रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था अंतर्गत MILTON सोलर लिमिटेड कंपनीचे ट्रेनिंग व रोजगार मेळावा संपन्न

फलटण-
रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था अंतर्गत MILTON सोलर लिमिटेड कंपनीचे ट्रेनिंग व रोजगार मेळावा हॉटेल महाराज एक्झिक्यूटिव्ह येथे संपन्न झाला. यावेळी रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सातारा जिल्ह्यातील महिला पुरुषांना रोजगार मेळाव्यासाठी आवाहन करण्यात आले होते. संस्थेच्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने महिला व पुरुष मेळाव्यामध्ये सामील झाले.त्यावेळी मिल्टन कंपनीच्या वतीने स्पेशल ट्रेनर कुणाल पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते.

त्यांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये कंपनी विषयी व सोलर विषयी सर्वांना माहिती दिली यावेळी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अतिशय सोप्या भाषेत उत्तरे दिली.व सर्वांचे समाधान केले.संस्थेच्या वतीने संस्थापक रझिया शेख यांनी सूत्र संचालन केले. मिल्टन कंपनीचे पार्टनर मुबारक शेख यांचा सत्कार अप्पासाहेब कापसे संचालक रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था यांनी केला. मुबारक शेख यांना संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले होते की तुम्ही जिल्ह्यामध्ये ट्रेनिंग घ्या
संस्थेच्या आव्हानाला मान देऊन मुंबईमध्ये होणारे ट्रेनिंग त्यांनी फलटणमध्ये घेऊन जिल्ह्यासाठी मोलाचे योगदान दिले. त्यांचे संस्थेच्या वतीने त्यांचे स्वागत करून विशेष आभार मानण्यात आले. तसेच मिल्टन कंपनीच्या वतीने दत्ता कोकरे मार्केटिंग पार्टनर यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी मिल्टन कंपनीच्या वतीने कुणाल पाटील, MILTON कंपनीचे पार्टनर मुबारक शेख,दत्ता कोकरे, संजय उबाळे ,शैलेश म्हात्रे, विजय कांबळे,किरण घुगरे महिला ऑफिस स्टाफ उपस्थित होता.

रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक रझिया शेख ,संचालक अप्पासाहेब कापसे,मा.प्राचार्य शाहीन शेख सचिव मारुती टकले.खजिनदार कैफ शेख,अप्पासाहेब कापसे, महेंद्र सपकाळ,सतीश देसाई,मानवाधिकार फाउंडेशन भारत चे महाराष्ट्र अध्यक्ष रणधीर भोसले, बजरंग गावडे प्रगती चळवळ चे पत्रकार प्रदीप सस्ते , उपस्थित होते.संस्थेच्या वतीने संस्थापक रझिया शेख यांनी मिल्टन कंपनीचे व उपस्थित बहुसंख्य लोकांचे आभार मानले महिला पुरुष यांना नोकरीची संधी मिळाली असुन झाला मेळावा यशस्वीरित्या पार पडला.




