जळगाव जिल्हा

जळगावात मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; राष्ट्रीय स्तरावरील पिस्टल शूटिंगपटू सहीष्णा सोमवंशीचा विशेष सन्मान

जळगाव-

जळगाव, दि. ४ जुलै २०२६ : जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आज नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे उत्साहात संपन्न झाला. दहावी, बारावी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
या सोहळ्यात राष्ट्रीय स्तरावरील पिस्टल शूटिंग स्पर्धेत महाराष्ट्रासह भारतासाठी पदक मिळवून देणारी कु. सहीष्णा सचिन सोमवंशी हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जालिंदर सुपेकर (विशेष पोलीस महानिरीक्षक तथा उपमहासमादेश्क, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य, मुंबई), मा. राजेश मोरे (मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव), डॉ. निलेश देविदास पाटील (शिक्षणाधिकारी – प्राथमिक, जळगाव), मा. कपिल जयकर पवार (उपसंचालक, आदिवासी विकास विभाग, नाशिक), मा. निलेशजी रणजित भोंडे (सचिव, जि.जि.म.वि.प्र. सह. समाज, जळगाव) आणि मा. अनिल तुकाराम पाटील (व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणासोबतच क्रीडा, संशोधन, स्पर्धा परीक्षा आणि सामाजिक क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन केले. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
हा सन्मान सोहळा जि.जि.म.वि.प्र. सह. समाज, जळगाव, नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव, मराठा सेवा संघ प्रणीत आणि मराठा उद्योजक कक्ष, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक, समाजबांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!