जळगाव जिल्हा

पाचोरा तहसीलसमोर 45 गावांतील दिव्यांगांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांवर प्रशासनाकडून लेखी आश्वासन.

पाचोरा-


दि. 27 जुलै 2026 सोमवार रोजी पाचोरा तालुक्यातील 45 गावांतील दिव्यांग बंधू-भगिनींनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पाचोरा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. हे आंदोलन राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, पिंपळगाव हरेश्वर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.
संस्थेच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव आपल्या हक्कांसाठी एकत्र आले. सन 2017 पासून दिव्यांगांच्या विविध प्रश्नांबाबत वारंवार पाठपुरावा करूनही तहसील प्रशासन व पंचायत समितीकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.यापूर्वी 16 जानेवारी 2025 रोजीही याच मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही ठोस कार्यवाही न झाल्याने दिव्यांगांना वारंवार तहसील व पंचायत समिती कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.आंदोलनादरम्यान प्रशासनाला निवेदन देत पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्याग्रामपंचायतीच्या 5 टक्के दिव्यांग निधीची प्रभावी अंमलबजावणी.
घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये 50 टक्के सवलत.दिव्यांगांना घरकुल व घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणे.रेशन कार्ड अंत्योदय योजनेत 30 दिवसांच्या आत समावेश करणे.संजय गांधी निराधार योजनेचा लाभ 45 दिवसांच्या आत मंजूर करणे.दिव्यांगांसाठी किमान 5 हजार रुपये मासिक पेन्शन लागू करणे.यावेळी तहसीलदार बनसोडे यांनी संस्था अध्यक्ष विकास लोहार व प्रतिनिधींशी चर्चा करून मागण्यांवर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. तसेच पंचायत समिती प्रशासनानेही लेखी स्वरूपात सकारात्मक प्रतिसाद दिला.प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपले धरणे आंदोलन स्थगित केले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!