राज्य
पेंटिपाका येथे पट्टा पद्धतीने धान लागवडीचे प्रात्यक्षिक

पेंटिपाका-( सिरोंचा प्रतिनिधि राजमोगली दुर्गम)
मौजा पेंटिपाका, ता. सिरोंचा, जि. गडचिरोली येथे दिनांक १९ ऑगस्ट २०२६ रोजी श्रीनिवास मूलकला यांच्या शेतावर पट्टा पद्धतीने धान लागवडीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
यावेळी पट्टा पद्धतीने धान लागवडीचे फायदे व महत्त्व उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांनीही या आधुनिक पद्धतीचा अवलंब करावा, यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
सदर प्रात्यक्षिक तालुका कृषी अधिकारी, सिरोंचा चेतन पाणबुडे, उपकृषी अधिकारी एस. एस. शिंगणे, सहाय्यक कृषी अधिकारी गौरव खेर्डेकर तसेच समूह सहायक अनुज शेंडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पट्टा पद्धतीने धान लागवडीबाबत मार्गदर्शन करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले.



