जळगाव जिल्हा

वडगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत ग्रामसभा न घेतल्याचा आरोप; विकासकामांची चौकशी करण्याची मागणी

पाचोरा-

तालुक्यातील वडगाव बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये नियोजित ग्रामसभा न घेतल्याबाबत तसेच विविध विकासकामे व आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनानुसार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी नियोजित ग्रामसभा घेण्यात आली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. तसेच  ग्रामपंचायतीमार्फत करण्यात आलेल्या विविध विकासकामांमध्ये झालेला खर्च, काढण्यात आलेली देयके, कामांची प्रत्यक्ष स्थिती आणि संबंधित कागदपत्रांची ग्रामसभेत माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी प्रत्येक कामाचे अंदाजपत्रक, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, कार्यादेश, एम.बी. (Measurement Book), संबंधित कामांसाठी काढण्यात आलेली देयके व रकमेची माहिती, तसेच कामांवर खर्च झालेल्या निधीचा तपशील उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
प्रत्यक्ष झालेली कामे आणि कागदोपत्री दाखविण्यात आलेली कामे यांची पडताळणी करून अनियमितता आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी, तसेच चौकशी अहवाल ग्रामसभेसमोर जाहीर करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता राहावी आणि ग्रामस्थांना गावातील विकासकामे व निधीबाबत संपूर्ण माहिती मिळावी, यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.सदरचे निवेदन देतेवेळी स्वप्निल कुमावत, सुरेश पवार,विजय पाटील,सागर पाटील,शुभम खरे,यांची उपस्थिती होती

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!