राज्य

कवली शिवारातील गोशाळे मधील गाईवर बिबट्याने केला हल्ला.

सोयगाव-

सोयगाव तालुक्यातील कवली शिवारात माता-पिता गोशाळा
संस्थेतल्या गाईवर केला बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.घटनास्थळी गोशाळा कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पळवून लावले व बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गाईवर व्हेटर्नरी डॉक्टरांच्या साह्याने उपचार केले.

गाईवर हल्ला झाल्याची माहिती वन विभाग अधिकारी तौर साहेब यांना देऊन सोयगाव येथील स्थानिक वनरक्षक सुनील हिरेकर यांनी घटनास्थळी जाऊन गायीचा पंचनामा केला.

त्यावेळी माता पिता गोशाळा सेवाभावी संस्था संस्थापक राजेंद्रजी गायकवाड, अध्यक्ष मनोज गायकवाड, संचालक दिनेश गायकवाड,सागर क्षिरसागर, स्पंदन लोहार,दगडु जाधव, संतोष चव्हाण, मोहीत जाधव, रोहित जाधव उपस्थित होते.

निसर्ग प्रेमी विवेक वाघे व सर्पमित्र दिनेश गायकवाड यांच्या कडुन परिसरातील शेतकरी यांना आव्हान करण्यात येत आहे कि जंगलातील वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भरकटत असतात ज्या परिसरात वन्य प्राण्यांचा संचार असेल त्या ठिकाणी वन्य प्राण्यांना कुठलीही बाधा येऊ नये.बाधा आल्यास त्या घटनेला सामोरे जावे लागेल. तर परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगावी.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!