राज्य

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’याजनेचे 80 लाख महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा..

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांनी जनतेस दिल्या शुभेच्छा

मुंबई –

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी महिलेला प्रति महिना 1500 रुपये दिले जाणार आहे. ही योजना जुलै महिन्यापासूनच लागू करण्यात आल्याने राज्य सरकारने जुलै व ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा पहिला हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्यानुसार खात्यात तीन हजार रुपये जमा होत आहेत.गुरूवारी सकाळपर्यंत 80 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 3 हजार रुपयांप्रमाणे 2400 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. रक्षाबंधन सणापूर्वी एक कोटींहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत.
विभागाच्या मंत्रीआदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस 32 लाख भगिनींना तर आज स्वातंत्र्यदिनी पहाटे 4 वाजता 48 लाख महिलांना त्यांच्या बँक खात्यात लाभ हस्तांतरित करण्यात आला आहे.

ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी महिला व बालविकास विभाग 24 तास कार्यरत आहे. आतापर्यंत एकूण 80 लाख महिलांना लाभ हस्तांतरण झाले असून, सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनापूर्वी लाभ हस्तांतर करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर कार्यरत असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले.दरम्यान, बुधवारपर्यंत 1 कोटी 64 लाख 40 हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. अजूनही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी पात्र महिलेचे बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे, अशी माहिती तटकरे यांनी दिली.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!