भडगाव व वलवाडी येथील तरूणांनी
केला शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश..
भडगाव-
दिनांक 25/08/2024
भडगाव येथील हकीम नगर तसेच तालुक्यातील वलवाडी येथील तरूणांनी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला.अलीकडेच झालेल्या खा.संजय राऊत यांच्या उपस्थितीतील मेळाव्यात शिवसेना-उबाठा पक्षात शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. यानंतर लागलीच आता भडगाव शहरातून हकीम नगर भागातील पदाधिकाऱ्यांनी वैशालीताई सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश घेतला. यासोबत भडगाव तालुक्यातील वलवाडी येथील असंख्य तरूणांनी देखील शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला. या सर्वांचे वैशालीताई सुर्यवंशी यांनी स्वागत केले.
या प्रवेश सोहळ्याला वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह मनोहरदादा पाटील, गणेशअण्णा परदेशी, योजनाताई पाटील, डी. डी. पाटील, चेतन पाटील यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.