वैशालीताईंच्या मागे नारीशक्ती : शेकडो महिलांचा पक्षप्रवेश..

भडगाव-
भडगाव शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील शेकडो माता-भगिनींनी वैशालीताई सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश घेतला असून या माध्यमातून पक्षाची ताकद वाढली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरू आहेत. यात आता निवडणुका तोंडावर आल्या असतांना वेग आलेला आहे. या अनुषंगाने भडगाव शहरासह टोणगाव आणि यशवंतनगर येथील शेकडो महिलांनी पक्षात प्रवेश घेतला. या सर्वांचे वैशालीताई सुर्यवंशी यांनी स्वागत केले. महागाईचे चटके देणाऱ्या महायुती सरकारला सत्तेतून बेदखल करण्यासाठी सर्व नारीशक्तीने प्रयत्न करावेत असे आवाहन वैशालीताई सुर्यवंशी यांनी याप्रसंगी केले.
या पक्षप्रवेश सोहळ्याला वैशालीताई सुर्यवंशी यांच्यासह योजना पाटील, पुष्पा परदेशी, मनीषा पाटील व अंकिता पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.