क्राईमजळगाव जिल्हा

आमिष दाखवून अल्पवयीन विद्यार्थिनीस पळविले;अज्ञात आरोपीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल.

पाचोरा-

पाचोरा शहरातील अल्पवयीन विद्यार्थिनीस अज्ञात इसमाने काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली असून अज्ञात आरोपी विरोधात पाचोरा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेबाबत स्थानिक पोलीस स्टेशन कडून प्राप्त माहितीनुसार दि.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ५  वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील राहत्या घरून अल्पवयीन १२ वी च्या विद्यार्थिनीस अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले याबाबत अल्पवयीन विद्यार्थीनी चा वडिलांनी  पाचोरा पोलीसात दिलेल्या फिर्याद वरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाणके हे करीत असून गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी दखल घेऊन गुन्ह्यातील अज्ञात आरोपीच्या शोधार्थ पथक सायंकाळी रवाना केले आहे.लवकरच आरोपीस ताब्यात घेऊन अटक केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी सांगितले.

पाचोऱ्यात शिवरात्री निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्टॉप यांचा वतीने फराळ वाटप

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!