जळगाव जिल्हा

सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा सहावा वर्धापन दिन, सातव्या वर्षात केले पदार्पण..

पाचोरा-

आज दिनांक 5 मे 2025 रोजी पाचोरा येथील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ने यशस्वी 6 वर्ष पूर्ण करून सातव्या वर्षात पदार्पन केले आहे.“सेवा आणि समर्पण“ हे ब्रीद घेऊन 5 मे 2019 रोजी आरंभीत झालेल्या ह्या आरोग्यसेवेचा नावलौकिक आणि विस्तार पाचोरा व भडगाव शहर आणि परिसरात पसरला आहे. ह्या आरोग्यसेवेच्या प्रवासात लोकांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेली साथ ही लाखमोलाची आहे.हॉस्पिटलमध्ये असलेली अत्याधुनिक यंत्रसामुग्री, प्रशिक्षित स्टाफ, सुसज्ज आयसीयू, स्वच्छता, तत्पर रुग्णवाहिका आणि सुसंवादी प्रशासन यामुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आत्मविश्वासाने उपचार घेण्यासाठी येथे येतात.
महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत डायलिसिस सेवा सुरू करून सिद्धिविनायक हॉस्पिटलने आरोग्यसेवेच्या क्षेत्रात सामाजिक भान दाखवले आहे. या योजनेअंतर्गत नवजात शिशूपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील रुग्णांवर दमा, मेंदूचे विकार, हृदयविकार, मलेरिया, डेंग्यू, सर्पदंश, विषबाधा, अपघाती इजा, फ्रॅक्चर अशा गंभीर आजारांवर मोफत उपचार सुरू झाले आहेत. नवजात बालकांसाठी NICU सुविधा आणि वयोवृद्धांसाठी वैद्यकीय सुविधा हा या हॉस्पिटलचा विशेष पैलू ठरला आहे.

कोरोना काळात डॉक्टर्स दांपत्याने अहोरात्र सेवा करत स्वतःचे प्राण धोक्यात घालून सामाजिक कर्तव्य पार पाडले. स्वतः बाधित होऊनही ते पुन्हा सेवा देण्यासाठी सज्ज झाले. त्यांच्या या समर्पणाचे अनेक उदाहरणे आज पाचोऱ्यात दररोज ऐकायला मिळतात. त्यांनी फक्त वैद्यकीय उपचारच केले नाहीत तर लोकांमध्ये आत्मविश्वास जागवला, भीती घालवली आणि माणुसकीचे दर्शन घडवले. या सहा वर्षांच्या कालखंडात त्यांनी केवळ रुग्णसेवा केली नाही तर आरोग्याच्या क्षेत्रात समाजाभिमुख उपक्रमांचीही एक शृंखला उभी केली आहे.

ग्रामीण व शहरी भागात वैद्यकीय शिबिरे, जनजागृती कार्यक्रम, माता-पित्यांसाठी मार्गदर्शन, मुलांच्या शाळांमध्ये तपासण्या, मोफत तपासणी योजना, सवलतीत औषधे देणारे उपक्रम राबवले गेले आहेत.
हे सर्व पाहता सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे केवळ एक उपचार केंद्र नाही तर सामाजिक स्वास्थ्याची चळवळ ठरली आहे.

हॉस्पिटलच्या पुढील टप्प्यात टेलीमेडिसिन सेवा, महिला आरोग्य केंद्र, मोफत कॅन्सर तपासणी, वृद्धांसाठी फिजिओथेरपी सुविधा, नर्सिंग व फार्मसी कॉलेज, कार्डियाक कॅथलॅब यांचे नियोजन पूर्ण झाले आहे. ही सेवा केवळ शहरापुरती मर्यादित न राहता, तालुक्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार या दांपत्याने केला आहे. त्यांच्या या नियोजनात केवळ वैद्यकीय सुविधा नाहीत तर रुग्णाच्या मानसिक आणि आर्थिक आधाराचा विचारही अंतर्भूत आहे.

डॉ. स्वप्निल आणि डॉ. सौ. ग्रिष्मा पाटील यांचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक सेवा उपक्रम आणि प्रत्येक उपचार यामागे असलेली माणुसकीची भावना या हॉस्पिटलच्या प्रत्येक भिंतीत खोलवर भिनलेली आहे. त्यामुळेच आज सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा वर्धापन दिन म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातल्या माणुसकीच्या विजयाचा साजरा ठरतो. सर्व पाचोरा व तालुक्याच्या जनतेकडून या सेवाभावी युगपुरुष व युगस्त्रीला मानाचा मुजरा आणि पुढील आरोग्यप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! ‘सिद्धिविनायक’ हे केवळ नाव नसून – आरोग्याचा आशीर्वाद देणारे श्रद्धास्थान!

सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा ६ व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा, भविष्यात अश्याच प्रकारे रुग्णांना आरोग्यसेवा आपणा कडून लाभो,आमच्या न्युज चॅनल कडून हिच सदिच्छा

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!