पाचोऱ्यात विश्वहिंदू परीषद बजरंग दलाचा वतीने शौर्य जागरण रथ यात्रा संपन्न.
पाचोरा-
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे हे ३५० वर्ष आणि विश्व हिंदू परिषदेचे षष्ठीपुर्ती ६० वर्षे पूर्ण या अनुषंगाने पाचोरा विश्व हिंदू परिषद बजरंग दल शौर्य जागरण रथयात्रा दिनांक १०/१०/२०२३ मंगळवार रोजी कृष्णापुरी जामनेर रोड वरील पुरातन चिमुकले श्री राम मंदिर येथून मोठ्या जल्लोषात बहुसंख्येने शौर्य जागरण रथ यात्रा निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री छत्रपती शिवरायांना मालापर्ण करून शौर्य जागरण रथयात्रेचे समारोप करण्यात आले.
यावेळी शौर्य जागरण रथ यात्रा प्रमुख योगेश जी पाटील पाचोरा प्रखंड मंत्री योगेश जी सोनार प्रखंड संयोजक बंटी जी पाटील जिल्हा संयोजक अतुल जी पाटील प्रखंड सह गोरक्षक भैय्या जी पाटील तालुका उपाध्यक्ष प्रवीण जी पाटील प्रखंड विद्यार्थी प्रमुख जय बागुल ज्ञानेश्वर भोई विशाल सोनवणे ललित पाटील मनोज पाटील राजू चव्हाण पंकज देसले समाधान पाटील गोकुळ पाटील असंख्य राम भक्त बजरंगी शिवप्रेमी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.