नगरदेवळा येथे गावठी दारूच्या हातभट्टीवर छापा,लाखो लिटर रसायन नष्ट

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा परिसरात गावठी दारूच्या सेवनामुळे युवकांचे बळी जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने अवैध दारू विक्रेते व उत्पादक यांना कडक इशारा देत शोधमोहीम तीव्र केली आहे. शुक्रवार पासुन नगरदेवळा गावातील दारू विक्रीच्या ठिकाणी गस्त घालून अनेक विक्रेते व भट्टी मालकांची तपासणी करण्यात आली. आज सकाळी धरण परिसरात गावठी दारू तयार करण्याच्या भट्टीवर पोलिसांनी छापा टाकत कच्चे पक्के रसायन, तयार दारू असा एकूण पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ते रसायन त्याच जागेवर नाश केले व सहा दारूच्या भट्ट्या जमीन दोष केल्या त्यात एका आरोपीला अटक केली असून त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा परिसरात गावठी दारूच्या सेवनामुळे युवकांचे बळी जात असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने अवैध दारू विक्रेते व उत्पादक यांना कडक इशारा देत शोधमोहीम तीव्र केली आहे. शुक्रवार पासुन नगरदेवळा गावातील दारू विक्रीच्या ठिकाणी गस्त घालून अनेक विक्रेते व भट्टी मालकांची तपासणी करण्यात आली. आज सकाळी धरण परिसरात गावठी दारू तयार करण्याच्या भट्टीवर पोलिसांनी छापा टाकत कच्चे पक्के रसायन, तयार दारू असा एकूण पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ते रसायन त्याच जागेवर नाश केले व सहा दारूच्या भट्ट्या जमीन दोष केल्या त्यात एका आरोपीला अटक केली असून त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.

नगरदेवळा गावात गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या गावठी दारूमुळे कित्येक तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कमी पैशात जास्त नशा मिळत असल्यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर व्यसनाधीन होऊन अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. दिनांक 13 फेब्रुवारी रोजी गावातील एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याचा मृत्यू गावठी दारू पिल्यामुळेच झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. त्या अनुषंगाने गावातील माजी उपसरपंच विलास भामरे यांनी पोलीस प्रशासनाला दारूबंदी विषयी जाब विचारला व अजून कित्येक तरुणांच्या मृत्यू होताना प्रशासन बघणार आहे? असा सवाल करत ठोस कठोर कारवाई करून गावठी दारू हद्दपार करा अन्यथा जन आंदोलन उभारू असा इशारा देण्यात आला होता. दि. १५ रोजी सकाळी पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार निवृत्ती मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हरीश अहिरे, दिनेश पाटील, वैभव पाटील मजीद पठाण यांच्या पथकाने गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने धरण परिसरात जाऊन कच्चे पक्के रसायन व त्यासाठी लागणारे सामग्री नष्ट केली व एका आरोपीस अटक करून त्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया
अवैध धंद्यांवर करडी नजर-नगरदेवळा कार्यक्षेत्रात ६ हातभट्ट्या उध्वस्त करून हजारो लिटर कच्चे रसायन नष्ट करून एका इसमा विरुद्ध कार्यवाही केली आहे. यापुढेही दारूविक्री व उत्पादन करणारे यांच्यावर कठोर कार्यवाही करून गुन्हे दाखल केले जातील.
पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे



