कष्ट,कर्तृत्व आणि कलेचा संगम ; डॉ.कादंबरी महाजन यांची प्रेरणादायी यशोगाथा

पाचोरा-
येथील प्रतिष्ठित व विद्वान कुटुंबातील कन्या डॉ. कादंबरी संदीप महाजन यांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि बहुआयामी गुणांच्या बळावर अल्पावधीतच उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पाचोरा येथील ज्येष्ठ पत्रकार तथा ध्येय करिअर अकॅडमीचे संचालक, श्री गो से हायस्कूलचे माजी उपशिक्षक, तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे माजी संचालक, स्वातंत्र्य सैनिक तथा पाचोरा नगरपालिका माजी ऑक्ट्रॉय इन्स्पेक्टर डी एल महाजन यांचे सुपुत्र संदीप दामोदर महाजन आणि श्री गो से हायस्कूलच्या उपशिक्षिका सौ शितल महाजन यांची कन्या असलेल्या कादंबरीने आपल्या कुटुंबीयांच्या सामाजिक व शैक्षणिक परंपरेला साजेसा मान उंचावला आहे. नुकतीच नवी मुंबई येथे Bachelor of Physiotherapy (BPT) ही पदवी प्राप्त करून तिने आपल्या व्यावसायिक आयुष्याची भक्कम पायाभरणी केली असून तिचा पुढील प्रवास अधिक उज्ज्वल होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. डॉ. कादंबरी महाजन या नवोदित फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत असून त्यांनी एमजीएम स्कूल ऑफ फिजिओथेरपी नवी मुंबई येथून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी 8.04 इतका उत्तम CGPA मिळवत शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. शिक्षणाच्या काळातच त्यांनी क्लिनिकल आणि प्रात्यक्षिक अनुभवाला मोठे महत्त्व दिले असून रुग्णांचे assessment, treatment planning आणि rehabilitation प्रक्रियेतील विविध टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला आहे. Neurological conditions आणि Musculoskeletal injuries या क्षेत्रांमध्ये त्यांची विशेष आवड असून त्यांनी या विषयांवर सखोल अभ्यास केला आहे. Patient handling, communication skills आणि therapeutic interaction यामध्ये त्यांची पकड मजबूत आहे, जे कोणत्याही यशस्वी फिजिओथेरपिस्टसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी स्वयंसेवी कार्यातही सक्रिय सहभाग घेतला आहे. विविध medical camps मध्ये volunteer फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करताना त्यांनी patient assessment, basic treatment आणि योग्य मार्गदर्शन केले आहे. तसेच रुग्णांना posture, exercise आणि injury prevention याबाबत मार्गदर्शन करून त्यांनी समाजसेवेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. Healthcare professionals सोबत समन्वय साधून त्यांनी community care देण्याचे कार्यही प्रभावीपणे पार पाडले आहे. डॉ. कादंबरी महाजन यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण पैलू म्हणजे त्यांची कला क्षेत्रातील आवड आणि प्राविण्य. सध्या त्या अंधेरी येथे डान्स कोरिओग्राफीचे शिक्षण घेत असून मुंबई येथील सुमीत खेतान यांच्या Events & Talent Management संस्थेमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दुबई, बहरेन, कतार आणि अबुधाबी येथे dance choreography आणि विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. तसेच त्यांनी विविध नामांकित national व international कंपन्यांचे Brand Ambassador म्हणूनही काम केले असून आपल्या व्यक्तिमत्त्व, सादरीकरण आणि संवाद कौशल्याच्या जोरावर त्यांनी त्या क्षेत्रातही ठसा उमटवला आहे. याशिवाय मुंबई येथील गोरेगाव स्पोर्ट क्लबवर आयोजित तीन दिवसीय गीत-नृत्य नाट्य प्रस्तुतीमध्ये त्यांनी सीता मातेची मुख्य भूमिका साकारत आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याची प्रभावी झलक दाखवली आहे. शालेय जीवनातही त्यांनी केवळ नृत्य क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दिल्ली येथील नोएडा येथे संपन्न झालेल्या खो-खो राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी राष्ट्रीय संघाचे कॅप्टन पद भूषवले होते, जे त्यांच्या नेतृत्वगुणांचे उत्तम उदाहरण आहे. Team spirit, leadership, time management आणि interpersonal skills या त्यांच्या मुख्य गुणांमुळे त्यांनी प्रत्येक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. डॉ. कादंबरी महाजन यांचा पुढील मानस अत्यंत स्पष्ट आणि दूरदर्शी आहे. त्या पुढील शिक्षणासाठी Post Graduation (PG) करण्याचा विचार करत असून त्याचबरोबर डान्स कोरिओग्राफीमध्ये करिअर घडवण्याचा त्यांचा निर्धार आहे. भविष्यात स्वतःचे Dance आणि Zumba classes सुरू करून समाजातील वृद्ध व्यक्ती, तसेच बाल-गोपाल, तरुण-तरूणींना योग्य मार्गदर्शन करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या बहुआयामी प्रवासातून आजच्या तरुण पिढीला प्रेरणा मिळावी अशीच अपेक्षा आहे. एकाच वेळी शिक्षण, कला आणि क्रीडा या तिन्ही क्षेत्रात संतुलन साधत यश मिळवणे ही सोपी गोष्ट नसून त्यासाठी dedication, consistency आणि hard work ची गरज असते, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. त्यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे संस्कार, बहीण डॉ. वैष्णवी हिचे मार्गदर्शन आणि पाठबळ हे महत्त्वाचे घटक ठरले आहेत. डॉ. कादंबरी महाजन यांचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यशाची कहाणी नसून समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या यशाचा आलेख भविष्यात आणखी उंचावेल, याबद्दल शंका नाही.



