जळगाव जिल्हा

जिल्ह्यात पोलिस पाटील कार्यशाळेला प्रचंड प्रतिसाद;विविध विभागांकडून मार्गदर्शन..

जळगाव-

जिल्हादंडाधिकारी कार्यालय व पोलिस अधीक्षक कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 एप्रिल मंगळवार रोजी जिल्हा नियोजन सभागृह ,जिल्हाधिकारी कार्यालय,जळगाव येथे जिल्ह्यातील पोलिस पाटील यांच्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जिल्ह्यातील पोलिस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी डॉ.श्रीमंत हारकर, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते तसेच अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी पोलिस पाटील यांना त्यांच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

फैजपूरचे उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी महसूल प्रशासनातील पोलिस पाटील यांची भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी  नितीन गणापुरे यांनी पोलिस प्रशासनातील जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरविर रावळ यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पोलिस पाटील यांची भूमिका अधोरेखित केली. निवडणूक उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी निवडणूक प्रक्रियेत पोलिस पाटील यांच्या कर्तव्यांची माहिती दिली. तसेच सहायक महसूल अधिकारी अतुल जोशी यांनी सध्या सुरू असलेल्या जनगणना कामाबाबत मार्गदर्शन केले.

ही कार्यशाळा पोलिस पाटील यांच्या कार्यक्षमता वाढीसाठी उपयुक्त ठरली असून प्रशासन आणि पोलिस यांच्यातील समन्वय अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!