भातखंडे खुर्द शिवारात पाचोऱ्यातील तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातून भातखंडे खुर्द शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन पाचोऱ्यातील 27 वर्षीय तरुणाने जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली असून या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भातखंडे खुर्द परिसरात 27 वर्षीय सतीश विठ्ठल तायडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 24 मे 2026 रविवार रोजी उघडकीस आली आहे.या घटनेबाबत पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर एका शेतातील लिंबाच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत पाचोऱ्यातील तरुण सतीश तायडे आढळून आला. ही घटना लक्षात येताच गावचे पोलीस पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अॅम्बुलन्स चालक किशोर लोहार आणि मयूर सोनार यांना घटनास्थळी बोलवून तरुणाचे शव पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केली असता मृत घोषित केले.या दुर्दैवी घटनेने शहर परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. य बाबत पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण समजून आले नाही.मयताचे मूळगाव रावेर तालुक्यातील असून सतीश तायडे मागील दहा ते पंधरा वर्षांपासून पाचोरा शहरातील बाहेरपुरा भागात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली असून अत्यंत सामान्य परिस्थितीत ते कष्ट करून उदरनिर्वाह चालवत होते. लिंबाचा झाडाचा पाला गोळा करून ते ट्रेनने मुंबईला घेऊन जाऊन विक्री करत असत. मयत हा दि. 23 मे 2026 रोजी ते घरात कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत रविवारी आढळून आला.मयताच्या पश्चात आई-वडील, चार भाऊ आणि तीन बहिणी असा मोठा परिवार आहे. काही भावंडांचा विवाह झाले आहेत. गरीब परिस्थितीत जगणाऱ्या या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.



