जळगाव जिल्हा

खताची वाहतूक करतांना ट्रॅक्टर पलटी;24 वर्षीय तरुणाचा मृत्यू, पाचोरा तालुक्यातील घटना..

पाचोरा-

पाचोरा तालुक्यातील लोहटार गावातून खताची वाहतूक करतांना ट्रॅक्टर पलटी झाल्याने या अपघातात 24 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना समोर आली असून पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की,पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील  24 वर्षीय सागर दीपक पाटील या तरुणाचा खताची वाहतूक करतांना ट्रॅक्टर पलटी झाल्याने या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.सदरची घटना अंतुर्ली रस्त्यावर, सरकारी दवाखान्याजवळ  घडली आहे.घटनेची माहिती मिळताच जिजाऊ अॅम्बुलन्स सर्विसचे भागवत पाटील आणि अमोल पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून मदत करत सागरला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सदर घटनेबाबत पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयताच्या पश्चात आई आणि एक बहीण असा परिवार आहे.
घराचा आधार असलेला तरुण मुलगा  निघून गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या दुर्दैवी घटनेने लोहटार परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!