जळगाव जिल्हा

सकाळ वृत्तपत्र समूहाच्या “गौरवगाथा पुरस्काराने सिध्दीविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ.स्वप्निल पाटील सन्मानित

पाचोरा-

वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा आणि समाजाप्रती असलेल्या समर्पित भावनेची दखल घेत सकाळ वृत्तपत्र समूहातर्फे सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा येथील संचालक डॉ. स्वप्निल प्रल्हादराव पाटील यांना प्रतिष्ठेचा ‘गौरवगाथा पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

सिद्धिविनायक हॉस्पिटलचे रोपण आणि विश्वासाचा वटवृक्ष
सन २०१९ मध्ये स्थापन झालेल्या सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या भिंतींवर कोरलेले ब्रीदवाक्य  “मातीतल्या माणसांची मनोभावे सेवा… निरामय आरोग्यासाठी आयुष्यभर समर्पण!”  हेच डॉ. स्वप्निल पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे मुख्य सूत्र ठरले आहे. अवघ्या काही वर्षांत या रुग्णालयाने परिसरातील नागरिकांचा विश्वास संपादन करत एका भक्कम आरोग्यसेवा केंद्राचे रूप धारण केले आहे.अचूक निदान, आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि रुग्णांप्रती असलेली आत्मीयता ही या रुग्णालयाची वैशिष्ट्ये मानली जातात. येथे अत्याधुनिक I.C.U., N.I.C.U., C.T. Scan सेंटर, 2D Echo, डायलिसिस सुविधा यांसह अनेक आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, रुग्णालयाला प्राप्त झालेले NABH मानांकन हे येथील गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा आणि रुग्णांच्या सुरक्षिततेबाबतच्या बांधिलकीचे प्रतीक मानले जाते.”मातीतल्या माणसांची मनापासून सेवा करणे हाच आमच्या आयुष्याचा खरा गौरव आहे. उपचारानंतर रुग्णांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा अधिक मोलाचे असते,” अशी भावना व्यक्त करत डॉ. पाटील गेल्या अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देत आहेत.

                    सामाजिक बांधिलकीची जपणूक
सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून १ जुलै २०२३ पासून रुग्णालयात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJAY) आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (PMJAY) कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या योजनांअंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्डधारक गरजू रुग्णांवर मोफत उपचार केले जात आहेत.सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलने केवळ वैद्यकीय उपचारच दिले नाहीत, तर रुग्णांच्या मनातील भीती दूर करून त्यांना नव्याने जगण्याची उमेद दिली आहे. त्यामुळे पाचोरा व भडगाव परिसरातील नागरिकांसाठी हे रुग्णालय आज विश्वासाचे आणि हक्काचे ‘आरोग्य मंदिर’ बनले आहे.डॉ. स्वप्निल पाटील यांना प्राप्त झालेल्या या प्रतिष्ठित सन्मानामुळे पाचोरा शहरासह संपूर्ण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या यशाबद्दल डॉ. स्वप्निल पाटील तसेच सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सर्व सहकारी वृंद यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!