रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगावतर्फे अस्थिमज्जा घनता तपासणी शिबिर संपन्न.

पाचोरा-
रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगाव यांच्या वतीने सिद्धिविनायक हॉस्पिटल, पाचोरा येथे नागरिकांसाठी अस्थिमज्जा घनता (Bone Density) तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. दिनांक 7 जुलै रोजी आयोजित या शिबिरात 86 नागरिकांनी सहभाग घेत आपल्या हाडांच्या आरोग्याची तपासणी करून घेतली.एनक्लिव चेयरपर्सन डॉ. मुकेश तेली यांच्या हस्ते रुग्ण नोंदणी करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी पाचोरा भडगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. शिवाजी शिंदे, प्रशासन सचिव डॉ. स्वप्नील पाटील व प्रकल्प सचिव डॉ. प्रशांत सांगडे उपस्थित होते.
या शिबिरप्रसंगी उप प्रांतपाल भरत सिनकर, चंद्रकांत लोढाया, डॉ. कुणाल पाटील, प्रदीप शांताराम पाटील, सुयोग जैन, डॉ. पवन पाटील, डॉ. किरण राजपूत, डॉ. सिद्धांत तेली, सौ. पिंकीताई जिनोदिया, श्री. गिरीश दुसाने, निखिल बिडकर, तसेच डॉ. अजय परदेशी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सिद्धिविनायक हॉस्पिटलचे असिस्टंट डॉक्टर, संपूर्ण स्टाफ यांनी परिश्रम घेतले.शिबिरामध्ये अस्थींची घनता तपासून ऑस्टिओपोरोसिस यासारख्या हाडांच्या आजारांविषयी जनजागृती करण्यात आली. नियमित तपासणी, संतुलित आहार, व्यायाम आणि योग्य वैद्यकीय सल्ल्याद्वारे हाडांचे आरोग्य जपण्याचे महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आले. या उपक्रमाबद्दल नागरिकांनी रोटरी क्लब ऑफ पाचोरा-भडगाव आणि सिद्धिविनायक हॉस्पिटलचे कौतुक करत अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे नियमित आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.



