क्राईमजळगाव जिल्हा

“स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई;30 हजार रुपये किंमतीची चोरीची मोटारसायकल हस्तगत, रेकॉडवरील आरोपी जेरबंद”

जळगाव-

जळगाव शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने अशा गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना अद्याप उघडकीस न आलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावून चोरीस गेलेली वाहने हस्तगत करण्याबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या.त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  राहुल गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करून वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याच्या तसेच आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. सदर पथक वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा प्रभावीपणे तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विश्वसनीय गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरील आरोपीत विशाल जुलाल जाधव (रा. एरंडोल, जि. जळगाव, हल्ली रा. विवरे खुर्द, ता. रावेर, जि. जळगाव) याच्याकडे असलेली हिरो कंपनीची डिलक्स, लाल-काळ्या रंगाची मोटारसायकल क्र. (MH-19/BT-9433 )ही चोरीची आहे.मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी पथकाला तत्काळ विवरे खुर्द, ता. रावेर येथे रवाना होण्याचे आदेश दिले. पथकाने तेथे जाऊन विशाल जुलाल जाधव याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकलीबाबत चौकशी करून संबंधित कागदपत्रांची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर अधिक कौशल्यपूर्ण व सखोल चौकशी केली असता त्याने सदर मोटारसायकल जळगाव महानगरपालिकेच्या पार्किंगमधून चोरी केल्याची कबुली दिली.
त्यानुसार सदर मोटारसायकल क्र.( MH-19/BT-9433) संदर्भात जळगाव जिल्हा गुन्हे अभिलेखाची पडताळणी करण्यात आली असता, जळगाव शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्र. १२६/२०२३, भादंवि कलम ३७९ अन्वये वाहन चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.सदर आरोपीविरुद्ध यापूर्वी घरफोडी व चोरी यांसारखे गुन्हे दाखल असून, त्याचा इतरही गुन्ह्यांमध्ये सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून एकूण ३०,०००/- किंमतीची लाल-काळ्या रंगाची क्र. (MH-19/BT-9433) ही मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ नंदलाल पाटील हे करीत आहेत.सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक  श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांचे मार्गदर्शनाखाली  वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उप-निरी सोपान गोरे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोना राहुल पाटील, पोकों जितेंद्र पाटील, पोकों भुषण पाटील, पोकों राहुल महाजन यांचे पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!