क्लबच्या नावाखाली जुगार सुरू असल्याच्या चर्चेवर पोलिसांची धडक!

सिरोंचा (प्रतिनिधी मुरलीधर मारगौणी)
क्लबच्या नावाखाली जुगार सुरू असल्याच्या चर्चेला गेल्या दोन दिवसांपासून वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावर उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर सिरोंचा पोलिसांनी संबंधित ठिकाणी धडक देत प्रत्यक्ष पाहणी व चौकशी केली.
video
सिरोंचा उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली. यावेळी कोणत्याही प्रकारचा जुगार सुरू असल्याचे किंवा पैशांवर खेळ व पैशांची देवाणघेवाण होत असल्याचे आढळून आले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
“प्रत्यक्ष पाहणी व चौकशीदरम्यान जुगाराचा प्रकार किंवा पैशांवर खेळ सुरू असल्याचे आढळले नाही,” असे उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, परिसरात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याचे आढळल्यास पोलिसांनी नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



