क्राईमजळगाव जिल्हा

सव्वा लाखांच्या चार दुचाकी जप्त; मोटारसायकल चोर अटकेत; पाचोरा पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी.

पाचोरा-

जळगाव जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर येथून दुचाकी चोरी करणाऱ्या एका संशयितास सोमवारी (दि.२७) पाचोरा पोलिसांनी अटक केली.त्यांच्याकडून १ लाख २० हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.जळगाव जिल्ह्यासह पाचोरा शहरात विविध ठिकाणी मोटारसायकल चोरी करणारे चोरटे सक्रिय असून चोरीचे गुन्हे उघड करुन चोरट्यांचा शोध घेवून कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना दिले होते. त्यानुसार पाचोरा पोलीस ठाण्याच्या पथकाने २७ रोजी वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत चार मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका संशयितास अटक केली. त्याच्याकडून चोरीस गेलेल्या चार मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असून, त्यांची अंदाजे किंमत १ लाख २० हजार रुपये ऐवढी आहे.गुन्ह्याचा तपास करीत असताना
पाचोरा पोलीसांना संशयित आरोपी नंदीचे खेडगाव येथे जळगाव रोडलगतच्या एका शेतातील शेडमध्ये लपून राहत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून अमोल राजेंद्र ढमाळे (वय २७, रा. नंदीचे खेडगाव, ता.पाचोरा, ह.मु. काळेनगर, जळगाव) याला ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने ४ मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्याकडून ४ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या. मोटार सायकल चोरी प्रकरणी त्याच्यावर पाचोरा, भडगाव, वाळुंज एमआयडीसी (छ. संभाजीनगर) पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदिप शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास पाटील, श्रीकांत गायकवाड, उमेश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील, संदीप पाटील, हरीश परदेशी या पथकाने ही कारवाई केली.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!