जळगाव जिल्हा

अहिल्यानगर हत्येच्या निषेधार्थ पाचोरा पोलिसांना निवेदन
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दलाची कठोर कारवाईची मागणी

पाचोरा | दि. ११ ऑगस्ट २०२६

अहिल्यानगर येथील मुकुंदनगर परिसरात ७ ऑगस्ट रोजी धिरजभैय्या परदेशी यांची हत्या झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद,राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने पाचोरा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. सदर निवेदन पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना देण्यात आले.
निवेदनात संघटनेने आरोप केला आहे की, धिरज परदेशी यांची हत्या धार्मिक द्वेषातून करण्यात आली. त्यांनी कपाळावर टिळा लावला होता तसेच हिंदू धर्माशी संबंधित कार्य करत असल्यामुळे त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.
या घटनेचा संदर्भ देताना संघटनेने काश्मीरमधील पहलगाम येथील घटना, बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले तसेच केरळमधील काही घटनांचा उल्लेख केला. अशा घटनांमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
अशा प्रकारच्या घटनांची तातडीने दखल घेऊन संबंधित आरोपींचा बंदोबस्त करावा, घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद , राष्ट्रीय बजरंग दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!