जळगाव जिल्हा

बाळद बुद्रुक येथील सुमारे एक कोटीची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेची उद्या चौकशी..

पाचोरा-

तालुक्यातील बाळद बुद्रुक येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या कामाबाबत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने उद्या २० ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात चौकशी बैठक आयोजित करण्यात आली आहे.
याबाबत पाचोरा ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या वतीने तक्रारदार शेखर साहेबराव पाटील यांना पत्र देण्यात आले आहे. जळगाव जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या पत्राच्या संदर्भाने ही चौकशी करण्यात येणार आहे.

चौकशी बैठकीसाठी गटविकास अधिकारी, तत्कालीन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे तत्कालीन अध्यक्ष व सचिव तसेच संबंधित ठेकेदार गोपाल चिंचोले यांना उपस्थित राहण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.
दरम्यान, बाळद येथील गाळण धरणावरील सुमारे एक कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामात ठेकेदार गोपाल चिंचोले यांनी अपहार केल्याचा आरोप करत तक्रारदार शेखर पाटील यांनी मुख्यमंत्री तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत चौकशी समिती नेमण्यात आली असून,

उद्याच्या बैठकीकडे ग्रामस्थांसह संबंधितांचे लक्ष लागले आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!