राज्य

पेंटीपाका येथील जि.प.शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पेंटीपाका-(प्रतिनिधी-सिरोंचा राजमोगली दुर्गम)

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेंटीपाका येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आर. आर. अग्गुवार, शिक्षक एस. आर. गोदारी व श्रीमती पी. जे. केवट यांची उपस्थिती होती.स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रघू दुर्गम व सरपंच श्रीमती बालक्का रेड्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने परिसर दुमदुमून गेला. यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध कवायत व संचलन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.ध्वजारोहण कार्यक्रमाला ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. रमेश दुर्गम यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व देशभक्तिपर कार्यक्रम सादर करत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणित केला.यावेळी विद्यार्थ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ तसेच साक्षरता शपथ घेतली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, देशभक्ती, शिक्षण व साक्षरता तसेच व्यसनमुक्ती याबाबत मार्गदर्शन केले.
शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ आणि उपस्थित मान्यवरांच्या सहकार्याने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!